धर्माबाद येथे
बिएलओ व पर्यवेक्षकांची आज बैठक
नांदेड दि. 14 :- आगामी सन 2019 मध्ये
महाराष्ट्रात लोकसभा / विधानसभा या दोन्ही सार्वत्रीक निवडणूका होणार आहेत. याची
पुर्वतयारी म्हणून दिनांक 1 जानेवारी 2019 या अहर्ता दिनांकावर आधारीत मतदार
नोंदणीचा विशेष संक्षीप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि 1 सप्टेबर ते 31 ऑक्टोबर
2018 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने शनिवार 15 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11
वाजता बिएलओ व पर्यवेक्षक तथा तलाठी यांची
तहसिल कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी
धर्माबाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत केली आहे.
तसेच ईव्हीएम आणि VVPAT बाबत जनतेमध्ये जागृकता
निर्माण व्हावी यासाठी माहिती देण्यात येणार आहे. भारत
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेमध्ये अपंगाचा सहभाग वाढावा
यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच तृथीय पंथीय मतदारांना देखील या पुनरिक्षण
कार्यक्रमाच्या माध्यमातून सामावून घ्यायचे आहे. विशेष संक्षीप्त पुनरिक्षण
कार्यक्रमाची व्यापक जनजागृती करुन जास्तीतजास्त मतदार नोंदणी होईल यासाठी प्रयत्न
करण्यात येणार आहेत.
बैठकीत बिएलओ यांनी आपल्याकडे प्राप्त
झालेले नमुना नं 6, 7, 8 व 8-अ इत्यादी अद्ययावत अर्जासह उपस्थित
राहावे. दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिध्दी केलेली मतदार
यादी गावातील पदाधिकारी नागरीक तसेच चावडी येथे वाचन करुन जास्तीत जास्त प्रसिध्द
करण्यात यावी एकही पात्र नागरीक मतदानापासुन वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्यावी,
असे आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार धर्माबाद यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment