जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी
28 सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत
नांदेड दि. 14 :- भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत
नेहरु युवा केंद्र नांदेड यांच्यावतीने दरवर्षी युवा विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय
कार्य करणाऱ्या संलग्नित युवा मंडळाला जिल्हा युवा मंडळ पुरस्कार दिला जातो. या
पुरस्कारासाठी युवा मंडळानी शुक्रवार 28 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज करावेत, असे
आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक विनायक धेंडे यांनी केले आहे.
1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या आर्थिक वर्षात युवा मंडळाने केलेल्या युवा
विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. नेहरु युवा
केंद्र नांदेड कार्यालयातर्फे आरोग्य शिबिर, व्यवसाय प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा,
विविध शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता, पर्यावरण, युवा आदान प्रदान
कार्यक्रम, राष्ट्रीय एकता कार्यक्रम, महिला सबलीकरण, स्वयंरोजगार, राष्ट्रीय व आंतर
राष्ट्रीय दिवस सामाजिक कार्यक्रम इत्यादी विविध क्षेत्रात कार्य केलेल्या
संलग्नित युवा मंडळाना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
या पुरस्कराचे स्वरुप 25 हजार रुपये धनादेश व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील संलग्नित ग्रामीण भागातील युवा मंडळ, महिला मंडळ, क्रीडा मंडळ, सेवाभावी
संस्था, व्यायामशाळानी अर्जाबरोबर मंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र घटना आर्थिक वर्षात
केलेल्या कामाचा पुरावा, लेखा परिक्षण अहवाल व ग्रामपंचायत कार्यालयाच्या शिफारशीसह
सर्व मंडळांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करावे. अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध आहे.
पूर्ण भरलेले अर्ज नेहरु युवा केंद्र राज निवास घर नंबर 21, मालेगाव रोड जैन मंदिरा
समोर शिवराय नगर नांदेड (दूरध्वनी नंबर 02462-263403) येथे मिळतील. शुक्रवार 28
सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज जमा करावे. या योजनेचा लाभ जास्तीतजास्त युवा मंडळांनी
घ्यावा, असे आवाहन जिल्हा युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र नांदेड यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment