लोकराज्यचा अंक
प्रकाशित
नांदेड दि. 1 :- "महाकर्जमाफी"
चा आढावा घेणारा ऑगस्ट महिन्याचा लोकराज्यचा अंक नुकताच प्रकाशित झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे सविस्तर विश्लेषण मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी 'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमाच्या
माध्यमातून केले. त्यासंबंधीचा वृत्तांत हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. अंक स्टॉलवर
सर्वत्र उपलब्ध आहे.
वस्तू व सेवाकर अधिनीयम 1 जुलै पासून देशभर लागू झाला. राज्याने
त्याचे कशाप्रकारे स्वागत केले या संबंधीचा लेख या अंकात घेण्यात आला आहे. राज्य
शासनाने यावर्षी 4 कोटी वृक्षलागवडीचा निर्धार केला होता. या मोहीमेचे यश, इको टास्क
फोर्स बटालियन व लावलेले वृक्ष, स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या
70 वर्षांमध्ये देशाने कोणकोणत्या क्षेत्रात आघाडी घेतली यासंबंधीचा थोडक्यात
आढावा, सौर ऊर्जेद्वारे आवश्यक तेवढी वीज घरीच कशी तयार
करायची याचे मार्गदर्शन, कृषी माल निर्यात करण्यासाठीचे
प्रशिक्षण, क्रीडा विभागाच्या योजना असे विविध लेख या अंकात
समाविष्ट करण्यात आले आहेत.
जलयुक्त शिवार, स्वच्छतेची सप्तपदी, आपला
गाव, कृषी यशकथा, सायबर महागुरू,
स्पर्धा परीक्षा, प्रेरणा, आरोग्य, नोंदी, स्मरण आदी
सदरांमधील माहिती प्रेरणादायी व उपयुक्त आहे. या माहितीपूर्ण व संग्राह्य अंकाची
किंमत 10 रुपये एवढी आहे.
000000
No comments:
Post a Comment