Tuesday, August 1, 2017

प्रधानमंत्री पीक विमा भरण्यास
5 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ  
           नांदेड दि. 1 :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2017 मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्याची अंतीम मुदत शनिवार 5 ऑगस्ट 2017 पर्यंत करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांनी विमा काढावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
           खरीप हंगाम सन 2017-18 मध्ये शासनाने अधिसुचित केलेल्या पिकांचा पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै 2017 पर्यंत मुदत दिली होती. ऑनलाईन विमा भरतांना तांत्रिक अडचणी लक्षात घेता या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्याची मुदत वाढविण्याचा निर्णय 1 ऑगस्ट 2017 रोजी राज्य शासनाने घेतला आहे.

000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...