Tuesday, August 1, 2017

अनुदानावर गोदाम बांधकामासाठी
अर्ज करण्याची 15 ऑगस्ट पर्यंत मुदत  
           नांदेड दि. 1 :-  कृषि विभागाच्यावतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी, राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियान अंतर्गत फ्लेक्झी फंडामध्ये गोदाम बांधकामासाठी अटी व शेर्तीच्या आधीन राहुन शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांच्याकडून मंगळवार 15 ऑगस्ट 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत , असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
           या योजनेचे प्रस्ताव बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडार योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे आसावा. इच्छुक लाभार्थ्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यता प्राप्त डिझाइन / स्पेसिफीकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रकासह तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे 15 ऑगस्ट  पर्यंत सादर करावा.
          प्राप्त लक्षांकाच्या आधीन राहून शेतकरी उत्पादक संघ / कंपनी यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत ज्या ठिकाणी गोदामांची व्यवस्था नाही व ज्या गावात हे दोन्ही कार्यक्रम राबविण्यात येतात अशा परिसरात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कडधान्य व गळीत धान्य अंतर्गत गोदाम बांधकाम कार्यक्रम देण्यात येतो. या योजनेंतर्गत कमाल 250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12.50 लक्ष रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे.
          लक्षांकाच्या तुलनेत जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने निवड करण्यात येईल. वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषाप्रमाणे लाभार्थ्यांची जागेची निवड करावी व त्याची खात्री जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी हे करतील. या योजनेचा एकदाच लाभ देण्यात येईल. बांधकाम चालु आर्थिक वर्षात पुर्ण करणे बंधनकारक आहे. अपुर्ण बांधकाम, मंजुर डिझाईन, स्पेसिफिकेशनमध्ये बदल केल्यास अनुदान देय राहणार नाही. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या कृषि माल साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना योग्य व माफक दरात करण्यात यावा, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

000000

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...