Friday, June 30, 2017

वसंतराव नाईक विजाभज महामंडळाच्या
बीज भांडवल योजनेबाबत आवाहन
नांदेड, दि. 30 :- वसंतराव नाईक विजाभज विकास महामंडळ यांच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या बीज भांडवल योजनेसाठी  प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन महामंडळाच्या नांदेड जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे
 विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील खालील योजनेचा लाभ बँकमार्फत देण्यासाठी सन 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये मुख्यालयाकडून 25 टक्के बीज भांडवल योजनेचे शंभर लाभार्थ्यांचे उद्दीष्ट देण्यात आले असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू लाभार्थ्यांनी जिल्हा कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा.
या योजनेची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. 25 टक्के बीज भांडवल योजना प्रकल्प मर्यादा 25 हजार ते दोन लाखापर्यंत यामध्ये 25 टक्के महामंडळाचे कर्ज व 75 टक्के बँकेचे कर्ज आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील पात्रता कागदपत्रांची आवश्यकता आहे. जातीचे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र. राशनकार्ड, दोन छायाचित्रे, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा असेल त्या जागेचा पुरावा भाडे पावती, लाइट बील, घर पावती. व्यवसायाचे कोटेशन. प्रकल्प अहवाल. रहिवासी प्रमाणपत्र. मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड. वाहन खरेदीसाठी लायसन्स, परमीट बॅच. यापूर्वी अर्जदाराने शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वय 18 ते 45 वर्षाच्या आत असावे. ही कागदपत्रे दोन प्रतींमध्ये साक्षांकित करुन कर्जाच्या अर्जासोबत वसंतराव नाईक विजाभज विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हिंगोली रोड ग्यानमाता हायस्कुल समोर  नांदेड येथे स्वत: सादर करावीत. गरजू लाभार्थ्यांनी जिल्हा कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक गुलाबसिंग घोती यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...