जिल्हयात वंचित
समुहातील नागरिकांची
मतदार यादीत नोंदणीची
मोहीम
नांदेड दि. 5 :- भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक
पात्र व्यक्तीची मतदार यादीत नोंदणी व्हावी यादृष्टीने मोहीम राबविण्यासाठी
सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हयात प्रत्येक पात्र व्यक्तीची मतदार
यादीत नाव नोंदणविण्यासाठीची मोहीम सुरु करण्यात आलेली
आहे. या मोहिमेत विशेषत कामगार, हमाल, कचरा
वेचणारे, दिव्यांग व्यक्ती आदींची यादीत
नावे नोंदविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे
जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.
या मोहिमेअंतर्गत नांदेड तहसिल व सेवाभावी संस्था यांच्या
मदतीने शहरात कचरा वेचणारे यांची नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी शिबिराचे
आयोजन करण्यात आले होते. यास अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
यामध्ये जवळपास 102 पात्र व्यक्तीचे मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज भरुन
घेण्यात आले तसेच विविध क्षेत्रात काम करणारे कामगार यांचीही कामगार दिनाच्या
निमीत्ताने नोंदणी करण्यात आली आहे. जवळपास 211 अर्ज प्राप्त
झाले आहेत. वरील प्रमाणे नोंदणीनंतर सर्व
पात्र अर्जदाराना लवकरच मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात येणार आहे.
याशिवाय सर्वच तालुक्यांमध्ये वंचीत
व्यक्तीची नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यामध्ये
बीएलओ हे झोपडपटृी, तात्पुरत्या निवा-यात राहणा-या व्यक्तींना भेट देवून त्यांची
नावे यादीत नसल्यास त्यांचेकडून अर्ज भरुन घेण्यात
येत
आहेत, अशी माहितीही उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नांदेड यांनी दिली
आहे.
000000
No comments:
Post a Comment