Friday, May 5, 2017

जनधन खातेदारांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे
रुपे एटीएम कार्डचे 8 मेपासून वितरण
नांदेड, दि. 5 :-  केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार बँकेच्या रोख-रहीत व्यवहार करण्यासंबंधी महाराष्ट्र ग्रामीण बँक क्षेत्रीय कार्यालय नांदेड यांच्याकडून सर्व खातेदारांना रुपे डेबिट एटीएम कार्ड घेण्याचे आवाहन केले आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 63 शाखेमार्फत सोमवार 8 मे ते शनिवार 20 मे 2017 पर्यंत गावनिहाय मेळावे घेऊन एटीएम कार्ड वितरीत केले जाणार आहे.    
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खातेदारांना एटीएम कार्डवर व्यवहार करणे आवश्यक आहे. एटीएम कार्डवर व्यवहार केल्यावरच त्यांना एक लाख रुपये वैयक्तिक अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच मेळाव्यामध्ये एटीएम कार्ड वापरण्यासंबंधी माहिती व सूचना बँकेमार्फत देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री जनधन खातेधारकांनी आपले एटीएम कार्ड घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा. अधीक माहितीसाठी आपल्या शाखेशी किंवा बँक प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असे आवाहन क्षेत्रीय व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बॅंक क्षेत्रीय कार्यालय नांदेड यांनी केले आहे.  

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...