Friday, May 5, 2017

रास्तभाव धान्य दुकानात
मे महिन्याची साखर उपलब्ध
नांदेड दि. 5 :- सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील बीपीएल व अंत्‍योदय शिधपत्रिकाधारकासाठी शासनाने मे 2017 साठी नियमित नियतन साखर प्रति व्‍यक्‍ती 500 ग्रॅम प्रमाणे प्रौढ अथवा मूल / बालक असा भेदभाव न करता मंजूर केले आहे. मे 2017 या महिन्‍यात जिल्‍हयासाठी 4 हजार 575 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले असून पुढील प्रमाणे तालुका निहाय नियतन देण्‍यात आले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.
नांदेड व लोहा- 534 , हदगाव- 399, किनवट- 527, भोकर- 175, बिलोली- 287, देगलूर- 255, मुखेड- 487, कंधार- 374, लोहा- 323, अर्धापूर- 128, हिमायतनगर- 198, माहूर- 194, उमरी- 135, धर्माबाद-152, नायगाव- 263, मुदखेड- 144. याची सर्व बीपीएल, अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍तधान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी , असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी  केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...