Friday, May 5, 2017

नांदेड जिल्हा परिषदेची
सोमवारी सर्वसाधारण सभा
नांदेड दि. 5 :- जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवार 8 मे 2017 रोजी दुपारी 2 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे आयोजित केली आहे, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) यांनी कळविले आहे.
या सभेत पाणीटंचाई आढावा, जि. प. उपकर सुधारीत अंदाजपत्रक सन 2016-17 व मुळ अंदाजपत्रक सन 2017-18, तसेच जि. प. उपकर योजना, विविध विकास कामे सन 2017-18 अंतर्गत आराखड्यास मान्यता देणे, या विषयसुची अन्वये कामकाज होणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक   218 आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे   डीपीसीचा निधी वाढवून मागणार पर्यटन व पर्यावरणाकडे लक्ष देणार  नांदे...