विधी साक्षरता शिबीर घेण्यासाठी
अशासकीय संस्थांनी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 20 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून विधी साक्षरता शिबीरे घेण्याकरीता प्रत्येक वर्षी अशासकीय संस्थेस अनुदान देण्यात येते. सन 2017-2018 या आर्थिक वर्षात नांदेड जिल्हयातून एका अशासकीय संस्थेचा प्रस्ताव विधी साक्षरता शिबीरे घेण्यासाठी अनुदानाकरीता अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नांदेड यांच्या शिफारशीने महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, मुंबई येथे पाठविण्यात येणार असून यासाठी विधी साक्षरता शिबीरे घेणाऱ्या अनुभवी अशासकीय संस्थेच्या प्रस्तावाची निवड करण्यात येईल. नांदेड जिल्हयातील इच्छूक अशासकीय संस्थांनी आपले प्रस्ताव सोमवार 8 मे 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेपूर्वी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, नांदेड यांचेकडे सादर करावीत.
प्रस्तावा सोबत सहायक अनुदान व संपूर्ण भरलेला अधिस्विकृती फॉर्म असावा, अशासकीय संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, अशासकीय संस्थेचा स्थापना लेख व अधिसंघ नियमावलीची प्रत, मागील तीन वर्षाचा लेखा परिक्षण अहवाल, संस्थेचा मागील आर्थिक वर्षाचा अहवाल, खर्चाचे अंदाजपत्रक, अशासकीय संस्थांचा विधी साक्षरता शिबीरामध्ये कामकरीत असल्याचा अनुभव कागदपत्रे, निती आयोग पोर्टलवर नोंदणीकृत असल्याबाबतचा पुरावा दाखल असणे आवश्यक आहे.
सन
2017-2018 मध्ये जिल्हयात घेण्यात येणाऱ्या शिबीराचे ठिकाण आदी कागदपत्रासह 3 प्रती मध्ये प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी व प्रस्तावा संबंधी नियमावलीसाठी सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड यांच्याशी संपर्क साधावा असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment