धर्माबाद आयटीआयमध्ये शिल्पनिदेशकांच्या
नेमणुकीसाठी 2 मे रोजी मुलाखती
नांदेड दि. 29 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्था धर्माबाद येथे शिल्पकारागीर योजनेअंतर्गत शिल्पनिदेशकांचे पदे अत्यंत
तात्पुरत्या स्वरुपात निव्वळ तासिका तत्वावर तत्वाभ्यास व प्रात्यक्षिक
शिकविण्यासाठी नेमणूक करावयाची आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी मंगळवार 2 मे
2017 रोजी मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्राच्या प्रतीसह सकाळी 11.30 वा.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे उपस्थित रहावे, असे आवाहन
प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद यांनी केले आहे.
ज्या व्यवसायासाठी शिल्पनिदेशकाचे पद निव्वळ
तासिका तत्वावर भरावयाची आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. यांत्रिक कृषित्र,
अभियांत्रिकी चित्रकला निदेशक, संधाता व जोडारी या व्यवसायाकरीता
शैक्षणिक अर्हता ही संबंधित व्यवसायामधील मेकॅनिकल अभियांत्रिकी किमान द्वितीय
श्रेणीत पदवी, पदविका व एक / दोन वर्षाचा अनुभव
किंवा संबंधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी, एटीएस परीक्षा उत्तीर्ण
व तीन वर्षाचा असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास व औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेशक, गटनिदेशक यांना प्राधान्य देण्यात
येईल. निवड झालेल्या उमेदवारांना शासन निर्णयानुसार अटी मान्य असल्याचे लेखी
हमीपत्र दिल्यानंतरच तासिका तत्वारील नियुक्ती मिळेल.
या संस्थेस यापुर्वी अर्ज सादर केलेल्या
उमेदवारांनी मंगळवार 2 मे 2017 रोजी संस्थेत उपस्थित
रहावे. तसेच त्यानंतर आलेल्या संबंधीत उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, असेही
प्रसिद्धी पत्रकात औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबादचे प्राचार्य यांनी सांगितले
आहे.
000000
No comments:
Post a Comment