दहावीच्या कला प्राविण्य गुणांसाठी
आणखी पाच संस्थांच्या प्रमाणपत्राना
मान्यता
नांदेड दि. 29 :-
शास्त्रीय कला क्षेत्रात
प्राविण्य मिळविणाऱ्या व लोक कला प्रकारात सहभागी होणाऱ्या दहावीच्या
विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याकरीता निवडण्यात आलेल्या संस्थांच्या
यादीमध्ये आणखी पाच संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. अशी माहिती राज्य माध्यमिक
व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर विभागीय मंडळाचे सचिव यांनी दिली आहे.
मार्च 2017 पासून
दहावीच्या परीक्षेमध्ये कला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात
सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार
वाढीव गुणाची सवलत देण्यासाठी शास्त्रीय संगीत, नृत्य व वादन तसेच लोककला
क्षेत्रातील संस्थांची प्रमाणपत्र देण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
इयत्ता 11 वीच्या
प्रवेशपत्रासाठी या शासनमान्य असणाऱ्या पाच संस्थांमधील विद्यार्थ्यांना कला
क्षेत्रातील राखीव जागांवर सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात येत
होता. या पाच संस्थांचा आता विद्यार्थ्यांना सवलतीच्या वाढीव गुण देण्याकरीता निवड
करण्यात आलेल्या संस्थांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येत आहे. या संस्था
पुढीलप्रमाणे अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, सरफोजी राजे भोसले डान्स रिसर्च
इन्स्टिटयूट, नालंदा नृत्त्य कला महाविद्यालय, श्री वल्लभ संगितालय आणि पुणे भारत
गायन समाज. या वाढीव गुणांकरीता प्रमाण देण्याची कार्यपद्धती 1 मार्च 2017 च्या
शासन निर्णयामध्ये नमूद केल्याचे मंडळाने म्हटले आहे.
00000
No comments:
Post a Comment