वृत्त क्रमांक 268
‘ॲग्रीस्टॅक’ योजना शेतीच्या लाभासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यक
नांदेड दि. 7 मार्च :- कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी अॅग्रीस्टॅक' म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषिविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याची नोंदणी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर सुरू असून ॲग्रीस्टॅक उपक्रमाची गावस्तरावर मोहिम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे.
शासनाच्याल महत्व कांक्षी प्रकल्पाठची यशस्वीस अंमलबजावणी करण्या साठी आज नियोजन भवन येथे प्रशिक्षण व जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्याीत आली होती. या कार्यशाळेस गटविकास अधिकारी, नायब तहसिलदार, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्राम विस्तारर अधिकारी, ग्रामसेवक, महसूल सेवक, पोलीस पाटील, रोजगार सेवक, अंगणवाडी सेवीका, आशा वर्कर, रास्तूभाव दुकानदार तसेच सरपंच, गावातील प्रतिष्ठी त नागरीक व सेवा भावी संस्थेगचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यशाळे दरम्याचण सीएससी केंद्र चालकांना अॅग्रीस्टॅरक आज्ञावली वापराचे प्रशिक्षण देण्याित आले.
अॅग्रिस्टॅक योजनेचे फायदे
थेट सरकारी अनुदान व मदत- पीएम किसान सन्मान निधी दरवर्षी थेट बँक खात्यात जमा होण्यास मदत होईल. तसेच पीक विमा, पीक कर्ज मंजुरी, कृषी अनुदान, खत व बियाणे योजनेचा जलद लाभ मिळणार आहे.
आधुनिक शेतीसाठी मदत
हवामान अंदाज, आधुनिक शेती सल्ला आणि बाजारभाव माहिती,मृदा परीक्षण व खत सल्ला राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व कृषी योजनांमध्ये प्राधान्य नवीन कृषी तंत्रज्ञान, अवजारे आणि सिंचन योजना, शेततळे, ठिबक सिंचन, गटशेती योजनेतील लाभ,गटगटवारी नोंदणी व शेतकऱ्यांसाठी विशेष सवलतीसाठी हे महत्वाचे ठरणार आहे.
दिनांक 8 ते 13 मार्च 2025 पर्यंत तालुक्याषतील सर्व गावात फार्मर आयडी तयार करण्यारसाठी सीएससी केंद्रा मार्फत विशेष शिबिर आयोजित करण्या त आले आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांनी त्यांकचे फार्मर आयडी तयार करण्याशचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्याव वतीने करण्या्त आले आहे.
या कार्यशाळेत निवासी उपजिल्हायधिकरी महेश वडदकर, तहसिलदार नांदेड संजय वारकड यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी चातरमल, प्रभारी गटविकास अधिकारी नारवटकर, निवासी नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार महसूल नायब तहसीलदार काशिनाथ डांगे, तालुका पुरवठा अधिकारी रवींद्र राठोड उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment