वृत्त क्रमांक 293
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून
दोन दिवसात एकूण 18 कारवाया
कारवाईत 3 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड, दि.16 मार्च :- धुलिवंदनामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी 14 मार्च 2025 रोजी किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तीस कोरडा दिवस घोषित करण्यात आला होता. या काळात अवैध मद्याची वाहतुक व विक्री मोठया प्रमाणात शक्यता नाकारता येत नसल्याने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील भरारी पथकाने 14 व 15 मार्च रोजी जिल्ह्यात एकूण 18 कारवाया केल्या.
यात एकूण 18 गुन्हे, वारस 18, अटक आरोपी 18, रसायन 200, देशी मद्य 71.64 लि, विदेशी मद्य 1.80 लि, ताडी 611 लि, जप्त वाहन संख्या 2 असा एकूण 3 लाख 18 हजार 605 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली जावेद कुरेशी, आशिष महिंद्रकर, लक्ष्मण पाटील, सरकाळे, सर्व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, सचिन शेट्टे, अमित वालेकर, रेणुका सलगरे, रामप्रसाद पवार, अमित आढळकर, मोनिका पाटील, संदीप देशमुख, श्रीमंत बोरुडे, अमोल शिंदे, श्री परते, कार्यकारी दुय्यम निरीक्षक शिवदास कुबडे, बळीराम इथर, दुय्यम निरीक्षक तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक, जवान आणि जवान-नि-वाहनचालक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी कार्यवाहीत भाग घेतला.
नांदेड जिल्ह्यात कोणीही अवैध मद्य खरेदी करु नये, तसेच अवैध मद्य, बनावट व परराज्यातील विदेशी मद्य कोणी बाळगून असेल किंवा विक्री करीत असेल तर यांची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागास द्यावी. तसेच या विभागाचा फोन नंबर टोल फ्री क्र. 1800833333 व व्हॉटसअप क्रमांक 8422001133 वर संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment