वृत्त क्रमांक 274
अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
· 30 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 10 मार्च :- सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज समाजकल्याण आयुक्तालय,म.रा.पुणे यांचे स्तरावर 30 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन पुणे समाज कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरीया यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये पदव्युत्तर पदवी व संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएचडी) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. तथापि सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (QX World University Ranking) 200 च्या आतील परदेशात शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यापैकी 30 टक्के जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येते. त्यासंबंधीची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
00000
No comments:
Post a Comment