वृत्त क्रमांक 214
क्रिकेटचा अंतिम सामना कोकण विरुध्द पुणे यांच्यात उद्या होणार
महिला उंच उडीमध्ये नाशिक विभाग पहिला
महिला टेबल टेनिस एकेरी व दुहेरीमध्ये अमरावतीची सरसी
उद्या दुपारपर्यंत चालणार क्रीडा स्पर्धा
नांदेड दि. 22 फेब्रुवारी : राज्यस्तरीय महसूल क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आले असून उद्या दुपारपर्यंत कोणता विभाग बाजी मारणार हे निश्चित होणार आहे. कोकण विभागाची दमदार आगे कुछ सर्व खेळांमध्ये चालू असून सर्वांचे लक्ष असणारा क्रिकेटचा सामना कोकण विरुद्ध पुणे असा उद्या रंगणार आहे उद्या चार वाजेपर्यंत सर्वसाधारण विजेतेपद निश्चित होणार असून पाच वाजताच्या सुमारास बक्षीस वितरण होणार आहे.
गुरुगोविंद सिंह जी क्रीडा संकुलात उद्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहे.
आज दुसऱ्या दिवशीच्या खेळांना सुरूवात झाली.आठही संघ एकमेका विरुध्द खेळत असून काही व्यक्तिगत प्राविण्यामुळे खेळांचे सूत्र प्रत्येक विभागाने आपल्या ताब्यात राखून ठेवले आहे.
काल झालेल्या क्रिकेट सामन्यात उपांत्य फेरी सामना कोकण विरुध्द अमरावती विभाग यांच्यात झाला हा सामना कोकण विभाग चार गडयांनी विजयी होऊन अंतीम फेरीत धडकला आहे. दुसऱ्या सत्रात पुणे विरुध्द नाशिक या सामन्यात पुणे विभागाने बाजी मारली. आता अंतिम सामना कोकण विरुध्द पुणे यांच्यात होणार. तर पुरुषाच्या थाळी फेकमध्ये पहिला क्रमांक नाशिक, दुसरा छ.संभाजीनगर, तीसरा क्रमांक पुणे विभागाने पटकाविला.
धावणे 100 मी पुरुष यामध्ये पहिला छ. संभाजी नगर, दुसरा अमरावती तर तीसरा कोकण विभागाने विजय मिळविला. धावणे 200 मीटर पुरुष पहिला अमरावती, दुसरा छ. संभाजीनगर तर तीसरा क्रमांक पुणे विभागाने पटकाविला. 400 मीटर धावणे यात छ. संभाजीनगर पहिला तर दुसरा नागपूर, तृतीय क्रमांक पुणे विभागाने मिळविला. 4 बाय 100 रिले धावणे पुरुष यात पहिला क्रमांक कोकण , दुसरा छ. संभाजीनगर तर तीसरा क्रमांक पुणे विभागाने मिळविला. 4 बाय 400 रिले धावणे यात कोकण विभाग पहिला तर दुसरा नागपूर तर तीसरा नाशिक विभागाने विजय मिळविला.
थाळी फेक पुरुष यात पहिला नाशिक, दुसरा छ. संभाजीनगर तीसरा पुणे विभागाने विजय मिळविला.
लॉन टेनिस एकेरी पुरुष फायनल मध्ये अंतिम सामना पुणे विरुध्द छ. संभाजीनगर यांच्यात होवून यामध्ये छ. संभाजीनगर विभागाने बाजी मारली. दुहेरीमध्ये अंतिम सामना अमरावती विरुध्द कोकण यामध्ये होवून कोकण विभाग विजयी झाला.
उंच उडी मध्ये पुरुष यात पहिला कोकण, दुसरा नाशिक व तीसरा क्रमांक पुणे विभागाने मिळविला. भाला फेक यात पहिला पुणे, दुसरा नागपूर तर तीसरा अमरावती विभागाने विजय मिळविला आहे. फुटबॉल यात सेमी फायनल मध्ये नाशिक विभागाने बाजी मारली. दुसऱ्या सत्रात नागपूर विभाग विजय ठरला. अंतिम लढत नाशिक विरुध्द नागपूर यांच्यात होणार आहे. कबड्डी पुरुष यात सेमी फायनलमध्ये नागपूर विरुध्द कोकण सामन्यात कोकण विभागाने बाजी मारली.
जलतरण 50 मीटरमध्ये फ्रीस्टाईल पुरुष यात पहिला नागपूर, दुसरा पुणे, तीसरा क्रमांक कोकण विभागाने तर जलतरण 50 मीटर बॅकस्ट्रोक पुरुष यात पहिला नागपूर, दुसरा पुणे, तीसरा क्रमांक कोकण विभागाने पटकाविला. जलतरण 100 मीटर फ्रीस्टाईल पुरुष यात पहिला पुणे तर दुसरा छ. संभाजीनगर, तीसरा नागपूर विभागाने विजय मिळविला. 4 बाय 50 जलतरण रिले पुरुष यात पहिला पुणे, दुसरा कोकण, तीसरा नागपूर विभागाने विजय मिळविला.
बुध्दीबळ अंतिम सामन्यात कोकण विभागाने बाजी मारली. गोळाफेक पुरुष यात पहिला छत्रपती संभाजीनगर, दुसरा अमरावती, तीसरा नाशिक विभागाने विजय मिळविला. हॉलीबॉल च्या सामन्यात कोकण विभागाने बाजी मारली.
महिलांच्या स्पर्धेमध्ये
खो-खो सामन्यात अमरावती विरुध्द छ. संभाजीनगर यांच्या लढतीत छ. संभाजीनगर विभागाने बाजी मारली. अंतिम सामना बाकी आहे. 100 मीटर धावणे यात पहिला नाशिक, दुसरा छ. संभाजी नगर, तीसरा क्रमांक कोकण विभागाने पटकाविला. तर 200 मीटर धावणे यात पहिला छ. संभाजी नगर, दुसरा नागपूर, तीसरा अमरावती विभागाने बाजी मारली. 400 मीटर धावणे यात पहिला छ. संभाजी नगर, दुसरा कोकण विभाग, तिसरा नाशिक विभागाने विजय मिळविला. 4 बाय 100 रिले धावणे यात पहिला कोकण , दुसरा नागपूर, तीसरा अमरावती तर 4 बाय 400 रिले धावणे मध्ये पहिला छ. संभाजी नगर दुसरा कोकण तर तीसरा अमरावती विभागाने विजय मिळविला.
उंच उडी मध्ये पहिला नाशिक, दुसरा कोकण, तीसरा क्रमांक नागपूर विभागाने मिळविला. रिंग टेनिस अंतिममध्ये अमरावती विरुध्द नाशिक यामध्ये अमरावती विभागाने बाजी मारली. टेबल टेनिस एकेरी मध्ये अंतिम सामन्यात अमरावती विभागाने विजय मिळविला. टेबल टेनिस दुहेरी मध्ये अंतिम सामन्यात अमरावती विभागाने विजय मिळविला. थाळीफेकमध्ये पहिला नागपूर, दुसरा कोकण, तीसरा पुणे विभाग पुढे आहे. गोळाफेकमध्ये पहिला नाशिक, दुसरा नागपूर, तीसरा पूणे विभागाने विजय मिळविला आहे.
00000
No comments:
Post a Comment