वृत्त क्रमांक 201
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत
पुणे संघाची विजयी सुरूवात
नांदेड दि. 20 फेब्रुवारी :- राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेमध्ये आज झालेल्या क्रिकेटच्या शुभारंभ सामन्यात पुणे विभागाने छत्रपतीसंभाजीनगर विभागाचा रोमहर्षक सामन्यात 7 धावांनी पराभव केला.
आज दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी क्रिकेटच्या सामन्याची सुरुवात केली. सर्व खेळाडुंची ओळख झाल्यानंतर सामन्याला सुरूवात झाली. पुणे विभागातर्फे उमाकांत मोरे, हरिष जनिरे, विकास माने यांनी अनुक्रमे 29, 20, 25 धावा काढत सर्वाधिक संघातर्फे धावा केल्या. तर संभाजीनगरकडून दिनेश सरोदे, पुणित मान, विठ्ठल गाडेकर यांनी गोलंदाजी करत अनुक्रमे 3, 2, 2 बळी घेतले. तत्पूर्वी संभाजीनगरकडून केसामी यांनी 33 धावा काढल्या. दिनेश सरोदे यांनी 31 धावा काढल्या. सर्व संघ 113 धावाकडून बाद झाला. पुणे संघाकडून असिफने 3 बळी घेतले.
श्री गुरूगोविंदसिंघजी क्रिडा संकुलातील क्रिकेट मैदानावर हा समाना रंगला. उद्यापासून तीन दिवस याठिकाणी क्रिकेटच्या सामने होणार आहेत. अन्य क्रीडा प्रकाराची उद्यापासून सुरुवात होणार आहे.
0000
No comments:
Post a Comment