वृत्त क्र. 1050
रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
मी मतदान करणारच अशी शपथ दिली
सेल्फी पॉइंटची उभारणी केली
नांदेड, दि. ९ नोव्हेंबर:- लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन कक्ष व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नांदेडच्यावतीने मतदान जनजागृती उपक्रम मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी रांगोळी स्पर्धा आज श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड च्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती .
रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. सर्व महिलानी मतदान केले पाहिजेत यासाठी रांगोळीमध्ये वेगवेगळे स्लोगनच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात आली . त्याचबरोबर सेल्फी पॉईंट देखील या ठिकाणी उभारण्यात आले होते.
यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तसेच जिल्हा स्वीप प्रमुख तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्ह्यातील नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.
या स्पर्धेचे आयोजन प्रकल्प संचालक डॉ .संजय तुबाकले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले .यावेळी स्वीप कक्ष शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ.श्रीमती सविता बिरगे, उमेद जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, गणेशसिंह चंदेल, जिल्हा समुपदेशक बालासाहेब कच्छवे ,जिल्हा व्यवस्थापक गणेश कवडेवार, माधव भिसे, तालुका अभियान व्यवस्थापक धम्मपाल ढवळे, गणेश आरोटले, तालुका व्यवस्थापक मल्लेश एडके, इरवंत सूर्यकार, श्रीमती कांता ताटे, प्रभाग समन्वयक श्रीमती वैशाली कोतवाले, निलेश जोंधळे, विनोद लोहोकरे तसेच जिल्हा कौशल्य समन्वयक अतिष गायकवाड, तालुका कौशल्य समन्वयक बालाजी गिरी तसेच लेखापाल हणमंत कंदुरके व उमेद अभियानाचे कर्मचारी तसेच ग्रामीण भागातून आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहातील महिला स्पर्धक सहभागी झाले होते.
मी मतदान करणारच अशी शपथ यावेळी घेण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालासाहेब कच्छवे यांनी केले.
०००००
No comments:
Post a Comment