वृत्त क्र. 1049
मुग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात 20 खरेदी केंद्र
नांदेड, दि. 8 नोव्हेंबर:- केंद्र शासनाचे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत एनसीसीएफच्यावतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी 1 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी 20 खरेदी केंद्र निश्चित केले आहेत. तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केद्रावर आणण्यापूर्वी आर्द्रताचे प्रमाण 12 टक्केपर्यतच असावे व सोयाबीन एफएक्यु दर्जाचा असावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.
प्रत्यक्षात मुग, उडीद खरेदी 10 ऑक्टोबर व सोयाबीन खरेदी 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरु झालेली आहे. मुखेड तालुका खरेदी विक्री संघ, मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ हदगाव, लोहा तालुका खरेदी विक्री संघ लोहा, कृषि उत्पन्न बाजार समिती, किनवट, तालुका खरेदी विक्री संघ बिलोली (कासराळी), पंडीत दीनदयाळ उपाध्याय अभिनव सह. संस्था देगलूर, मष्णेश्वर फार्मर प्रोडयुसर कंपनी लि. धनज ता. मुखेड, सिद्राम फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. बेटमोगरा ता. मुखेड, किनवट तालुका कृषिमाल प्रक्रीया सह. संस्था गणेशपूर ता. किनवट, तिरुपती शहापूर फार्मर प्रोडयुसर कंपनी लि. वन्नाळी ता. देगलूर, राधामाई फार्मर प्रोड्युसर कंपनी रातोळी ता. नायगाव, अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सह. संस्था मानवाडी फाटा ता. हदगाव, श्रीजगदंब फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. जांब बु. ता. मुखेड, नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सह खरेदी विक्री संस्था नांदेड ता. अर्धापूर, कुंडलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कुंडलवाडी ता. बिलोली, बळीराम पाटील फळे व भाजीपाला प्रक्रिया सहसंस्था मुखेड बेरली खुर्द ता. मुखेड, मुखेड फळे व भाजीपाला उत्पादक सहसंस्था उमरदरी ता. मुखेड , जय महाराष्ट्र शेतीमाल खरेदी विक्री सहकारी संस्था कौठा ता. कंधार, नांदेड प्रगती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी चेनापूर ता. धर्माबाद, स्वामी विवेकानंद अभिनव सहकारी संस्था मर्या शेळगावथडी ता. धर्माबाद याठिकाणी मार्केटीग फेडरेशनमार्फत मुग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु झालेली आहे.
00000
No comments:
Post a Comment