वृत्त क्र. 1051
किनवट मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची 10 नोव्हेंबरला द्वितीय तपासणी
नांदेड दि. 9 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 83- किनवट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची द्वितीय तपासणी रविवारी 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत निवडणूक खर्च तपासणी कक्ष, आय. टी.आय. , किनवट येथे केली जाणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे.
अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमीत केलेल्या परिपत्रकांनुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल याची नोंद घ्यावी.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत:,ती स्वत: किंवा त्याच्या, तिच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तिला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे, असे 83- किनवट विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली (भाप्रसे) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment