Sunday, November 10, 2024

 वृत्त क्र. 1058

लोकविधान पोर्टलचा वापर करावा : डॉ. सचिन खल्लाळ

निवडणूक प्रक्रियेतील सर्व बाबींची माहिती लोकविधान पोर्टलवर

नांदेड दि. १० नोव्हेंबर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व 16 लोकसभा पोटनिवडणूकीसाठी 20 नोहेंबर रोजी मतदान होत आहे.  निवडणूक प्रक्रियेतील सर्व बाबींची माहिती देण्यासाठी निवडणूक निरीक्षक सामान्य पत्लवी आकृती यांच्या मार्गदर्शनानुसार 87 नांदेड दक्षिणचे  निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खत्लाळ यांनी लोकविधान पोर्टल निर्माण केले आहे.

या पोर्टल ची लिंक lokvidhaan.blogspot.com ही असून यात मतदान अधिकारी यांचे संपूर्ण कर्तव्य , ईव्हीएम मशीन हाताळणी प्रात्यक्षिक , मतदान यंत्र सिलींग , अभिरूप मतदान , विविध घोषणा पत्रे आदीचे सविस्तर विश्लेशन लोक विधान पोर्टल मध्ये करण्यात आले आहे. निवडणूक कर्तव्या वरील सर्व मतदानअधिकारी / कर्मचारी यांनी या पोर्टल चा वापर करून निवडणूक कार्य निर्भयपणे पार पाडावे असे आवाहन  नांदेड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी  डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.

०००००



No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...