Sunday, November 10, 2024

वृत्त क्र. 1060

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन दिवसात 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड जिल्हयाच्या दलाकडून 7 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत 33 धडक कारवाया                                                

नांदेड, दि. 10 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. दिनांक 7 ते 9 नोव्हेंबर रोजी विभागाने एकूण 33 ठिकाणी धडक कारवाया करुन दि. 7 नोव्हेंबर रोजी 2 लाख 26 हजार 520 आणि 8 ते 9 नोव्हेंबर 2024 रोजी एकूण 5 लाख 90 हजार 510 रुपयांच्या असा एकूण 8 लाख 17 हजार 30 रुपयांचा मुद्देमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे.

तसेच 7 नोव्हेंबर रोजी भोकर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव व भोकर पोलीस स्टेशनचा स्टाफ यांचेसमवेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करुन 7 कारवाया करुन 57 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

7 नोंव्हेबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये एकूण गुन्हे 14, वारस 13, अटक आरोपी 13, हातभट्टी 30 लि, रसायन 810 लि. देशी मद्य 79.90 लि, विदेशी मद्य 17.28 लि, ताडी 170 लि, जप्त वाहन संख्या 01 असा एकूण 2 लाख 26 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 8 व 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईत एकूण गुन्हे 19, वारस 19, अटक आरोपी 19, हातभट्टी 40 लि, देशी मद्य 81.36 , विदेश मद्य 22.96 लि, ताडी 110 लि, जप्त वाहन संख्या 2 असा एकूण सर्व मुद्येमाल 5 लाख 90 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये विभागामार्फत धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. निवडणूक काळामध्ये यामध्ये अधिक वाढ करण्यात आली असून अवैध दारू विक्रीवर विभागाची काटेकोर नजर आहे.  

जिल्ह्यात आचारसंहिता लागू असून या काळामध्ये कोणीही अवैध मद्य खरेदी करू नये. तसेच स्वत:जवळ बाळगू नये, असे आवाहन विभागाने केले आहे. मद्याचा गैरवापर निवडणूक काळात होत असल्यास या संदर्भात नागरिकांनी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 व व्हॉटसॲप क्र. 8422001133 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमध्ये अधिक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नमाला गायकवाड, जावेद कुरेशी, आशिष महिंद्रकर, सरकाळे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...