Sunday, November 10, 2024

 वृत्त क्र. 1059

स्वीपअंतर्गत् आज युवा मतदार मेळावा आणि 

पोलीस भरती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन                   

नांदेड, दि. 10 नोव्हेंबर :- लोकसभा पोट निवडणुक २०२४ व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने स्वीप अंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. उद्या सोमवार 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयआयबी पर्णकुटी, एम.जी.बी.च्या समोर, यशवंत कॉलेज रोड, हर्ष नगर, शामनगर, नांदेड येथे युवा मतदार मेळावा व पोलीस भरती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.                                

हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपाचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...