वृत्त क्र. 40
श्री क्षेत्र माळेगांव येथे भव्य कृषी प्रदर्शनाचे
आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
· डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण
नांदेड (जिमाका), दि. 12 :- जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत श्री क्षेत्र माळेगांव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या कृषि प्रदर्शनात एकूण 133 स्टॉल उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार श्यामसुंदर शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते 10 जानेवारी रोजी करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, मंजुषा कापसे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, प्रकल्प संचालक संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आउलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती आर.पी. काळम, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक सविता बिरगे, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी बोधनकर, इतर विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, स्टॉलधारक, शेतकरी व पत्रकार यांची उपस्थिती होती.
या प्रदर्शनात कृषि निविष्ठा, रासायनिक खते 8, बियाणे 19, किटकनाशक औषधी कंपन्या-17 विविध (यंत्रे, सुक्ष्म सिंचन) कृषि औजारे 16, ट्रॅक्टर 11, नर्सरी 3, सेंद्रीय शेती 2, महिला बचत गट 5, एमएसआरएलएम 15 व विविध शासकीय विभागाचे 14, बॅक 1, इतर (शेती उपयोगी व खाद्य स्टाल) 24 असे एकूण 133 स्टॉल उभारण्यात आले आहे. नामांकित मुख्य बियाणे कंपनी त्यांनी कापूस उत्पादक कंपन्यांनी लाईव्ह झाडे लावण्यात आली आहे. भाजीपाला उत्पादक कंपनी यांनी भाजीपाला यांचे लाईव्ह नमुने ठेवण्यात आले. कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी राशी व महिको कंपनीमार्फत एकात्मिक व्यवस्थापन मॉडल उभारले आहे. ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलित अवजारे पेरणी यंत्र, नांगर, मोगडा, ताडपत्री , कडबा कटर विद्युत पंप इ. अवजार साहित्य विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आलेले आहे. नर्सरी फळे व भाजीपाला रोपे, सेंद्रिय खत, बचत गटामार्फत तयार केलेल्या चटणी पापड कुरडया डाळी विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आलेले आहेत.
कृषि विभागामार्फत फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत भाजीपाला 151 (26 प्रकारचे भाजीपाला नमुने ) फळे -144 ( 25 प्रकारचे फळे नमुने ) मसाला पिके -29 (6 प्रकारचे मसाला नमुने ) असे एकूण 324 ( 57 प्रकारचे नमुने )प्राप्त झाले आहेत. त्याची पाहणी आमदार श्यामसुंदर शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केली आहे. 324 (57 प्रकारचे नमुने ) प्राप्त झाले आहेत.
या स्पर्धेत 324 सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त अनुक्रमे 4 हजार रुपये, 3 हजार रुपये व 2 हजार रुपये या प्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे, असे कृषि विकास अधिकारी विजय बेतीवार यांनी सांगितले.
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त 10 ते 14 जानेवारीपर्यंत स्टॉल सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू असणार आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागा मार्फत करण्यात आले आहे.
सन 2023-24 या वर्षामध्ये कृषि क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या 19 शेतकऱ्यांना डॉ. शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात खडकी येथील उध्दव रामराव कदम, बोरगाव येथील आनंदराव रामजी रुमणवाड, निवघा येथील बालाजीराव भाऊराव पवार, मालेगाव येथील अमोल बालाजी सावंत, करंजी येथील संजय बळवंतराव चाभरकर, हसनाळी येथील केदार महादेव कावडे, साप्ती येथील कबीरदास विश्वनाथ कदम, नागठाणा येथील केशव शंकरराव लिंगाडे,जांब बु येथील रामराव जिवनराव गोंड, लखमापूर येथील प्रमोद शिवाजी बेहरे,कोकलेगाव येथील माधुरी मारोती मिरकुटे, कोल्हारी येथील श्रीमती अंजनाबाई दिगांबर अंकुरवाड, रामपूर येथील अनिल हणमंतराव इंगोले पाटील, धानोरा म. येथील भागवत व्यंकटी कदम,गंगनबीड येथील धोंडीबा रामदास राहेरकर, लोहगाव येथील रमेश विश्वनाथराव शेटकर, वटफळी येथील दत्ता शंकर कदम, वडगाव बु. येथील लक्ष्मण देवराव पवार, पिंपळगाव ढगे येथील वसंत विश्वांभर ढगे यांचा समावेश आहे. कृषि क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 16 शेतकऱ्यांचा व उत्तेजनार्थ 3 शेतकऱ्यांचा असे एकूण 19 पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते डॉ. शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
0000
No comments:
Post a Comment