Friday, January 12, 2024

 वृत्त क्र. 39 

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी

'अमृत'च्या योजना मोलाच्या

-         मुख्य वित्त व लेखाधिकारी महेश वाकचौरे 

नांदेड (जिमाका), दि. 12 :-  खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आपले जीवन उन्नत बनवावे, असे आवाहन संस्थेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी तथा नांदेड जिल्हा पालक अधिकारी महेश वाकचौरे यांनी केले. 

नांदेड येथे संपन्न झालेल्या लाभार्थ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत 'अमृत'च्या विविध योजनांबाबत लाभार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. राज्य सरकारचा 'अमृत' हा अतिशय महत्वांकांक्षी प्रकल्प आहे. यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अर्थसहाय्यसंघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड केलेल्या उमेदवारांना अर्थसहाय्यआर्थिक विकासासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी करणे आदि उपक्रम आहेत. कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देवून स्वावलंबी बनविणेकौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधणे आदी योजना 'अमृत'मार्फत राबविल्या जात आहेत. या योजनांची खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु इतर कोणत्याही शासकीय कार्यालय, महामंडळे अथवा संस्थांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा घटकांनी आवर्जुन लाभ घ्यावाअसे महेश वाकचौरे यांनी सांगितले. 

शहर व जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या त्यांनी भेट घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत विभाग समन्वयक गंगाधर कोलमवार, एस. गजेंद्र, एस. जी. धोतरे, कैलास बंडगर, सत्यनारायण पवळे, बी. बी. बेटमोगरेकर उपस्थित होते. यानिमित्ताने समाजातील विविध मान्यवरांनी काही महत्वपूर्ण सूचनाही केल्या. अमृतच्या योजनांची अधिकाधिक व्यापकता निर्माण करण्यासाठी संस्था प्रयत्न करेल, असे आश्वासन वाकचौरे यांनी दिले.

0000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...