वृत्त क्र. 38
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी
18 जानेवारीपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका), दि. 12 :- क्रीडा क्षेत्रात क्रीडा विकासासाठी जीवन व्यतीत केले आहे, अशा व्यक्तीना प्रतिवर्षी राज्य शासनाच्या वतीने शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने शासनास सन 2022-23 या वर्षाचे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी च्या नामांकनासाठी शिफारस करावयाची आहे. त्यानुषंगाने शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत 18 जानेवारी 2023 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी क्रीडा कार्यालयासी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे 29 डिसेंबर, 2023 शासन निर्णयान्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना करण्यासाठी क्रीडापटू किंवा क्रीडा मार्गदर्शक किंवा कार्यकर्ते अथवा संघटन म्हणून क्रीडा क्षेत्रात काम केले आहे. क्रीडा क्षेत्रातील कार्यामुळे महाराष्ट्राचे नाव देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचविण्यात संस्मरणीय कामगिरी केली आहे किंवा क्रीडा क्षेत्रात मुलभूत स्वरुपाचे विशेष कार्य केले आहे. तसेच त्यांचे वय वर्षे 60 किंवा अधिक आहे, अशा व्यक्तींची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात येते, असे क्रीडा विभागाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment