ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी
नामनिर्देशन सादर करण्याच्या वेळेत वाढ
नांदेड (जिमाका) दि. 17 :- राज्य निवडणूक आयोगाने 3 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी निवडणूक कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणाली द्वारे निवडणूक प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. दिनांक 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहेत. त्यानुसार 16 ऑक्टोबरपासून संगणकप्रणालीद्वारे नामनिर्देशनाची प्रक्रीया सुरु झाली आहे.
नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणकप्रणालीद्वारे भरले जात आहे. मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहे. या तांत्रिक अडचण महा ऑनलाईनकडून दूर करण्यात आल्या आहेत. तरी 18 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी 11 ते दु. 3 वा पर्यतची वेळ सांय. 5.30 वाजेपर्यत वाढविण्यात आली आहे असे राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सुर्यकृष्णमूर्ती यांनी पत्रका द्वारे कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment