18 आक्टोबरला माहूर येथे नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
नांदेड, दि. 17 आक्टोंबर : नवरात्रीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राज्यातील 10 ठिकाणी नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देण्यासाठी बुधवारी, दिनांक 18 आक्टोंबर, 2023 रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील श्री. रेणुकादेवी महाविद्यालय माहुर यांच्या सभागृहात आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना श्री. सुधीर मुनगंटीवार, मा. मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून, या कार्यक्रमास मार्गदर्शन श्री. विकास खारगे, मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे.
दिनांक 18 ते 23
आक्टोंबर या कालावधीत महाराष्ट्राच्या 06 महसुली विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी
(मुंबई, पुणे, नाशिक, छ.संभाजीनगर, अमरावती व नागूपर ) तसेच साडेतीन
शक्तीपिठांच्या ठिकाणी (कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, वणी ) नवरात्रीच्या
पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची
माहिती देणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 18 आक्टोंबर, 2023 रोजी माहूर येथील श्री. रेणुकादेवी महाविद्यालय माहुर यांच्या सभागृहात नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री श्री. गिरीष महाजन, श्री. हेमंत पाटील, मा. सदस्य लोकसभा, श्री.भीमराव केराम, मा. विधानसभा सदस्य हे यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
हा कार्यक्रम
रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी नवदुर्गा: जागर स्त्री शक्तीचा
या सांस्कृतिक कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती
देणाऱ्या समारंभास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद
द्यावा, असे आवाहन श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment