Monday, May 15, 2023

 

अनुदान योजनाबीजभांडवल योजनेसाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने मातंग समाज व 12 पोटजातीना अनुदान योजना व बीज भांडवल योजनेचा लाभ बँकेमार्फत देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेवुन महामंडळाच्या नांदेड जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

सन 2023-2024 या आर्थिक वर्षामध्ये अनुदान योजनेचे  व बीजभांडवल योजनेचे  उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. अनुदान योजनेत प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयापर्यंत गुंतवणूक असणाऱ्या रक्कमेत 10 हजार रुपये अनुदान व उर्वरीत बँकेचे कर्ज राहील. बिजभांडवल योजनेत प्रकल्प मर्यादा 50 हजार 1 ते 70 हजार रुपयापर्यंत लाभार्थ्याचा सहभाग 5 टक्केमहामंडळाचे कर्ज 20 टक्के (10 हजार रुपये अनुदानासह) व बँकेचे कर्ज 75 टक्के राहील. या योजनेत स्थिर भांडवल निर्मितीच्या उद्योगाचे कर्ज प्रस्ताव जसे वाहन, यंत्रे व मशिनरी खरेदीसाठी व तसेच इतर विविध व्यवसायासाठी उद्दीष्ट देण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दोन छायाचित्रे, राशन कार्ड,  आधार कार्ड, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेचा पुरावा, व्यवसायाचे कोटेशन, अनुभव प्रमाणपत्र, शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्र व शौचालय बांधल्याबाबत ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र, प्रकल्प अहवालनिवडणूक ओळखपत्र, दुकानाचा परवाना / लॉयसन्सपरमीट / बॅच , योजनेचे कर्जाचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 50 वर्षाच्या आत असावे. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ           डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, हिंगोली रोड नांदेड या ठिकाणी संपर्क साधावा.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   1148 राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेतील लाभार्थ्यांनी 5 डिसेंबरपर्यत आधार पडताळणी करुन घ्यावी...