Monday, May 15, 2023

 प्रभावी संपर्क आणि तत्परता यातच आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

· मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांचे दक्षतेचे निर्देश 

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- येणारा मान्सून हा काही प्रमाणा दरवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात जरी दर्शविला असला तरी संभाव्य आपातकालिन परिस्थिती केंव्हाही उद्भवू शकेल हे गृहीत धरुन सर्व यंत्रणांनी दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळेपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस. चौगले. बी. बिराजदारजिल्हा परिषदेचे  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेजिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदेजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटीलजिल्ह्यातील सर्व तहसिलदारगटविकास अधिकारी यांच्यासह विद्युतअग्निशमनआदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

जिल्ह्यात गोदावरीपैनगंगामांजराआसनालेंडीकयाधूमन्याड या नद्या व या नद्याच्या उपनद्या यांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील पूरप्रवण गावाची संख्याही मोठया प्रमाणात आहे. जिल्ह्यातील 16 तालुक्यामध्ये 337 गावे ही पूरप्रवण क्षेत्रात मोडतात. या गावातील शासकीय यंत्रणानी विशेषत: गाव पातळीवरील ग्रामसेवकतलाठीपोलीस पाटीलतहसिलदारगटविकास अधिकारी यांना परस्परात समन्वय ठेवून कोणत्याही स्थितीत एकत्रित दक्षता घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

गोदावरी नदीवर पूर नियंत्रणासाठी असलेली महत्वाची ठिकाणे व त्या-त्या ठिकाणावरुन अतिवृष्टी झाल्यास पूर वहणाचा सर्वसाधारण कालावधी  हा संबधीत अधिकाऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर नियत्रंण कक्ष कार्यान्वित करुन त्यावर जबाबदार अधिकारीकर्मचारी यांची नेमणूक करावी असे त्यांनी स्पष्ट केले. गावपातळीवर ग्राम आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्या बैठका घेवून यात गावातील लोकांनाही विश्वासात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य व्यवस्थेसाठी लागणारी औषधेपाण्यातून होणारे आजार लक्षात घेता पुरेशा प्रमाणात ब्लिंचीग पावडरस्वच्छतेच्यादृष्टीने नगर/महानगर पालिका क्षेत्रातील नाले सफाईवीज वितरणात अडथळा होणार नाही यादृष्टीने आपतकालिन व्यवस्थापन या बाबीवर त्यांनी भर देवून सर्व यंत्रणेला दक्षतेच्या सूचना दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील यांनी प्रारंभी आपत्ती व्यवस्थापन बाबत सविस्तर सादरीकरण केले. 

0000










No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...