Monday, May 15, 2023

 जिल्हा युवा महोत्सवाचे 22 मे रोजी आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 15 :- स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मूल्य जागृत करणेराष्ट्रभक्तीसमताबंधुत्वाची भावना वृध्दींगत करणे आणि युवा कलावंताना व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी 22 मे रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानांदेड येथे जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाद्वारे युवकांच्या कलागुणांना वाव आणि संधी मिळेलत्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या महोत्सवात सहभाग घ्यावाअसे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

युवा महोत्सवात युवक-युवतीसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा लेखन स्पर्धा (कविता लेखन) पहिले पारितोषक हजारद्वितीय 750, तृतीय 500 रुपये असे आहे. युवा कलाकार स्पर्धा (चित्रकला) पहिले पारितोषक हजार रुपयेद्वितीय 750 रुपयेतृतीय 500 रुपये आहे. मोबाईल छायाचित्रण स्पर्धा पहिले पारितोषक हजारद्वितीय 750, तृतीय 500 रुपये असे आहे. भाषण स्पर्धा पहिले पारितोषिक हजारद्वितीय हजारतृतीय हजार रुपये असे आहे. जिल्हा सांस्कृतिक महोत्सव (समुह नृत्य) पहिले पारितोषिक हजारद्वितीय हजार 500 रुपयेतृतीय हजार 250 रुपये असे आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे तसेच प्रमाणपत्रमेडल व ट्रॉफी व सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व स्पर्धा सकाळी वा. सुरु होणार आहेत. सांस्कृतिक महोत्सव दुपारी वा. सुरु होईल. युवा महोत्सवात वेगवेगळया शासकीय योजनाच्या माहितीचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. स्पर्धेत 18 ते 29 वर्षे वयोगटांच्या युवक-युवतीनी 20 मे पर्यत आपला सहभाग नोंदवावाअसे युवा अधिकारी चंदा रावळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...