सामाजिक समता पर्व कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन
नांदेड (जिमाका) दि. 25 :- नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना तसेच संविधानानुसार काम करणाऱ्या सर्व यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही संविधानाची ओळख करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून जिल्हाभर साजरा केला जात आहे. दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी संविधान दिन ते 6 डिसेंबर 2022 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन हा कालावधी सामाजिक समता पर्व म्हणूनही साजरे केले जात आहे.
सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाअंतर्गत
शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालय, सर्व अनुदानित व
विनाअनुदानित महाविद्यालयात या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये
सर्व शासकीय कार्यालयामध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन, प्रभात फेरी, तज्ज्ञ
व्यक्तींचे संविधान विषयक व्याख्यान, महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व
स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक
आयुक्त तेजस माळवदकर यांनी दिली. दिनांक
26 नोव्हेंबर रोजी प्रभातफेरी, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व तज्ज्ञ
व्यक्तींकडून मार्गदर्शन, सामाजिक न्याय भवनात कार्यशाळा हे उपक्रम आहेत. 27
नोव्हेंबर रोजी निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, लेखी परीक्षा, वक्तृत्त्व स्पर्धा,
28 नोव्हेंबर रोजी संविधान विषयक व्याख्यान, 29 नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय
भवनात कार्यशाळा, 30 नोव्हेंबर रोजी भित्तीपत्रक पोस्टर्स, बॅनर्स, चित्रकला
स्पर्धा, 1 डिसेंबर रोजी युवागटांची कार्यशाळा, 2 डिसेंबर रोजी वस्तींना भेटी, 3
डिसेंबर रोजी ज्येष्ठ नगारिक, दिव्यांग, तृतीयपंथी, वृद्ध यांची कार्यशाळा, 4 डिसेंबर रोजी जात
प्रमाणपत्र पडताळणी शिबीर, तालुकास्तरावर योजनांच्या माहितीची कार्यशाळा, 5
डिसेंबर रोजी संविधान जागर, महापरिनिर्वाण दिन अभिवादनात्मक कार्यक्रम, 6 डिसेंबर
रोजी समता पर्वाचा समारोप आदी विविध उपक्रम नियोजित केले आहेत.
00000
No comments:
Post a Comment