Thursday, February 11, 2021

 

46 कोरोना बाधितांची भर तर

30 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- गुरुवार 11 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 46 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 18 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 28 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  30  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 747 अहवालापैकी 698 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 771 एवढी झाली असून यातील 21 हजार 720 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 253 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 7 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 590 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 21, माहूर तालुक्यांतर्गत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 4 असे एकूण 30 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.38 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 14, देगलूर तालुक्यात 1, परभणी 1, भोकर 1, उमरी 1 असे एकुण 18 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 7, लोहा तालुक्यात 1, किनवट 16, लातूर 4 असे एकूण 28 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 253 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 13,  मुखेड कोविड रुग्णालय 3, किनवट कोविड रुग्णालय 17, महसूल कोविड केअर सेंटर 3, देगलूर कोविड रुग्णालय 1,  नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 160, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 29, हैदराबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 13 आहेत.   

गुरुवार 11 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 170, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 96 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 16 हजार 232

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 89 हजार 85

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 771

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 720

एकुण मृत्यू संख्या-590

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.38 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2 

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-253

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-7.          

0000

 

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...