Friday, August 7, 2020

वृत्त क्र. 733

 जप्त रेतीसाठ्याचा तहसिल कार्यालयात बुधवारी लिलाव

नांदेड (जिमाका), दि.7:- नांदेड तालुक्यातील ईटीएस मोजणीअंती जप्त रेतीसाठा 505 ब्रासमध्ये मौ. ब्राम्हणवाडा येथे गटनंबर निहाय आहे. या रेतीसाठयाचा लिलाव नांदेड उपविभागीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली बुधवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे होणार आहे. नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत रेतीसाठा केल्याचे निर्दशनास आले होते. हा रेतीसाठा जप्त करुन त्याची ईटीएस मोजणी केली आहे. संबंधितांनी हा रेतीसाठा पाहून तपासून लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ लोकशाही प्रक्रीयेत सहभागासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र...