Monday, April 13, 2020


कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी सर्वांची मदत गरजेची
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड दि. 13 :- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांची मदत गरजेची आहे, असे आवाहन राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्‍हाण यांनी केले. कंधार तालुक्यात कोरोना नियंत्रसंदर्भात विभागनिहाय आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कंधार तहसिल कार्यालयाच्‍या सभागृहात आज संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस आमदार अमर राजुरकर, आमदार श्‍यामसुदर शिदे, माजी अमदार श्‍वरराव भोसीकर, मुक्‍तेशवर धोंडगे, माजी नगरअध्‍यक्ष शहाजी नळगे, डॉ. शाम तेलंग, मन्‍नान चौधरी, बालाजी पांडागळे, बाबुराव गीरे यांच्यासह उपविभागीय अधिकारी पी. एस. बोरगावकर, तहसिलदार सखाराम मांडवगडे, पोलीस उपविभागीय अधिकारी किशोर कांबळे, तालुका कृषी अधिकारी श्री देशम आदींची यावेळी उपस्थित होती.
पालकमंत्री अशोक चव्‍हाण म्हणाले, नागरिकांनी लॉकडाऊन काळात देण्यात येत असलेल्या विविध सुचनांचे पालन करुन सर्वांनी एकजुटीने कोरोनाशी लढा दयावा. विविध सेवाभावी संस्‍थांकडून देण्यात येत असलेली मदत लक्षात घेऊन गरिबांना विविध योजनेत समाविष्ट करुन त्यांना मदत सुरुच ठेवावी. आरोग्य सुविधा देण्यासाठी आवश्यक साधनसामुग्रीचा पुरवठा करण्यात येईल. लॉकडाऊनच्‍या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारीडचणी विभागांनी समन्‍वय करुन सोडवाव्यात. शहरी व ग्रामीण भागात सोडीएम हॉपोक्‍लोराईड फवारणी करावी. भाजीपाला विक्रीसंदर्भात अवश्‍यक ती खबरदारी घ्यावी. कोरोना विषाणु नियंत्रणासाठी, पाणीटंचाई उपाय योजनेसाठी सर्व उपायोजना कराव्यात. यासह विविध सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी विविध विभागांना दिल्‍या. यावेळी माजी जिल्‍हा परीषद सदस्य पुरुषोत्‍तम धोंडगे यांनी मुख्‍यमंत्री सहाय्यता कोव्हीड निधीमध्‍ये 1,01,111 रुपयांचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.
बैठकीत कंधार नगरपरिषद कंधार येथे एक कोरोना नियंत्र समीती व ग्रामीण भागामध्‍ये 116 कोरोना नियंत्र समित्‍या स्‍थापित केल्‍या असुन त्‍यानुसार कार्यवाही चालु आहे.  तालुका स्‍तरावर 24 तास नियंत्र कक्ष स्‍थापन केल्‍याचे सांगीतले. बाहे जिल्ह्यात, राज्‍यात, देशातील आलेल्‍या नागरीकांची संख्‍या शहरी भागामध्‍ये 392 व ग्रामीण भागामध्‍ये 6 हजार 490 असून एकुण 6 हजार 882 नागरीक आहेत. नागरीकांची अरोग्‍य तपासणी करुन होम क्वारंटाईन केल्‍याचे सांगण्‍यात आले. कंधार तालुक्‍यातील बाहेर जिल्‍हयात 727 मजुर अडकुन पडली आहेत. कंधार तालुक्यात बाहेर जिल्ह्यातील अडकेलेल्या मजुरांची माहितीत कलथीया कॅम्‍प उस्‍माननगर येथे 103  मजुर, कलथीया कँम्‍प गौळ येथे 117 मजुर, कलथीया कँम्‍प फुलवळ येथे 12, रुद्रायनी कॅम्‍प हळदा येथे 71, शारदा कॅम्‍प रुई येथे 58 असे एकुण 361 मजुर असल्‍याचे सांगीतले. त्यांची रहाण्‍याची व जेवण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे. कंधार तालुक्‍यात जंतु नाशक फवारणी अहवाल सादर करण्‍यात आली असून शहरात नगरपालीकेने दोन फवारणी टीसीएल पावडर वापरुन केले आहे. तसेच 116 ग्रामपंचायतीमध्‍ये देखील दोन फवारणी टीसीएल पावडर वापरुन केलआहे. कंधार तालुक्‍यामध्‍ये 12 सेवाभावी संस्‍थेमार्फत जेवन व जवनावश्‍यक वस्‍तु वाटप करण्‍यात येते. सेवाभावी संस्‍थेमार्फत दररोज 1 हजार 260 जणांना वाटप करण्‍यात येते. ग्रामीण रुग्‍णलय कंधार येथे 20 बेड व ग्रामीण भागातील पानशेवडी, बारुळ, कुरुळा, पेढवडज, उस्‍माननगर प्राथमीक अरोग्‍य केंद्रात प्रत्‍येकी 5 बेड असल्‍याची माहिती सांगण्‍यात आली. कंधार तालुक्‍यामध्‍ये शहरी भागात 27 व ग्रामीण भागात 36 खाजगी दवाखाने असुन यासर्व दवाखाण्‍याची ओपीडी चालु ठेवण्‍यासंदर्भात डॉ असोशियशनची बैठक घेन निर्देश देण्‍यात आले सर्व खाजगी दवाखाने सुरु असल्‍याचे सांगीतले. कंधार तालुक्‍यामध्‍ये कोरोना संशयीत व्‍यक्‍तींना कॉरानटाईन करण्‍यासाठी नगरपालीका इमारतीत 50 बेड व सदगुरु श्रमशाळा येथे 50 व्‍यक्‍तीचे व्‍यवस्‍था होईल असे पर्व नियोजन करण्‍यात आले आहे अशी माहिती देण्यात आली.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...