Monday, April 13, 2020


अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी
शासकीय, निमशासकीय विश्रामगृहे आरक्षित
नांदेड, दि. 13 :- साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 अन्‍वये निर्गमित करण्‍यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतूदीनूसार जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्राप्‍त झालेल्‍या अधिकाराचा वापर करुन जिल्‍हयातील सर्व शासकीय, निमशासकीय विश्रामगृहे हे केवळ डॉक्‍टर, पॅरामेडीकल स्‍टाफ तसेच, कोव्हिड 19 च्‍या अनुषंगाने अत्‍यावश्यक सेवा बजावणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी पुढील आदेशापर्यंत राखीव ठेवण्‍यात आली आहेत.
सार्वजनिक आरोग्‍य विभागाचे प्रधान सचिव यांनी राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 34 मधील  तरतुदीनुसार 14 मार्च 2020 अधिसुचना निर्गमित केली आहे.
साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 मधील तरतुदीनुसार नमुद अधिसुचना 14 मार्च 2020 मध्‍ये जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपायोजना करणे आवश्‍यक आहे. त्‍याकरण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषित केले असून 13 एप्रिल रोजीच्या नमुद आदेशानुसार संपूर्ण नांदेड जिल्‍हयात फौजदारी संहिता दंडप्रकियेचे कलम 144 लागू आहे.
या आदेशाची अंमलबजावणी सर्व उपविभागीय अधिकारी तथा Incident Commander तसेच, सर्व तहसिलदार, तथा Assistant Indent Commander  यांनी तात्‍काळ प्रभावाने अंमलात आणावी. जे कोणी व्‍यक्‍ती, समुह सदर आदेशाचे उल्‍लंघन करील त्‍यांचे विरुद्ध आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 अन्‍वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्‍यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.  
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...