Monday, April 13, 2020


कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ;
सर्व बँकांना शेतकऱ्यांची रक्कम वाटप करतांना
सामाजिक अंतर, टोकन पद्धतीने कामे पार पाडावीत
-         जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर   
नांदेड, दि. 13 :-  जिल्‍हयातील सर्व बॅंकांनत्‍यांनी त्‍यांच्‍या अधिनस्‍त शाखांमधुन  शेतकऱ्यांना वाटप करण्‍यात येणारे शासकीय अनुदान व पिक विम्‍याच्‍या रक्‍कमा सामाजिक अंतर राखुन, टोकन पध्‍दतीचा वापर करुन, स्‍वयंसेवकांची मदत घेवून व वेळेचे नियोजन करुन सदर कामे पार पाडाव, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
नांदेड जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपायोजनेचा एक भाग म्‍हणून नागरीकांची  एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्‍यासाठी नांदेड जिल्‍हयातील सर्व बॅंकातुन होणारे पीक विमा, कर्ज वाटप व शासनाकडून देण्‍यात येणारे सर्व अनुदानाचे वाटप पुढील आदेशापर्यंत बंद करण्‍याचे आदेशित करण्‍यात आले होते. बॅंकाचे इतर व्‍यवहार यापूर्वी दिलेल्‍या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन‍ नियमितपणे चालु राहतील असे सुचित करण्‍यात आले होते. जिल्‍हयातील शेतकऱ्यांची आर्थिक समस्‍या विचारात घेवून 31 मार्च 2020 रोजी देण्‍यात आलेले आदेश  रद्द करण्‍यात आला आहे.
जिल्‍हयातील सर्व बॅंकांनत्‍यांनी त्‍यांच्‍या अधिनस्‍त शाखांमधुन  शेतकऱ्यांना वाटप करण्‍यात येणारे शासकीय अनुदान व पिक विम्‍याच्‍या रक्‍कमा सामाजिक अंतर राखुन, टोकन पध्‍दतीचा वापर करुन, स्‍वयंसेवकांची मदत घेवून व वेळेचे नियोजन करुन सदर कामे पार पाडावत. ग्राहकांकडून सामाजिक अंतर राखण्‍यास सहकार्य मिळत नसल्‍यास संबंधित शाखेचे शाखाधिकारी यांनी नजिकच्‍या पोलीस स्‍टेशनकडून पोलीस सहकार्य घेवून कामकाज करावे. याशिवाय अत्‍यावश्‍यक नसलेली कामे (जसे, पास बुक नोंद करुन देणे, नवन खाते उघडणे व इतर ) अशी कामे या काळात करण्‍यात येवू नयेत. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी जिल्‍हयातील जिल्‍हा बॅंकेच्‍या शाखांकडून याकामी पोलीस संरक्षणाची मागणी केल्‍यास त्‍यांना नि:शुल्‍क पोलीस संरक्षण देणेसाठी जिल्‍हयातील सर्व पोलीस स्‍टेशनला सुचित करावे, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...