Thursday, March 5, 2020


   प्रेस नोट
          मा. राज्‍य निवडणूक आयोग महाराष्‍ट्र राज्‍य यांनी नांदेड तालुक्‍यातील 24 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्‍यांत आलेला आहे.त्‍या संदर्भान्‍वये ग्रामपंचायत निवडणूक लढविण्‍यासाठी नामनिर्देशन पत्र भरणा-यां ईच्‍छूक उमेदवारांना याव्‍दारे कळविण्‍यांत येते की, दिनांक 07/03/2020 रोजी शासकिय सुट्टी आल्‍याने सदरील दिवशी नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार नाहीत.
        तसेच मा. राज्‍य निवडणुक आयोग महाराष्‍ट्र यांचे क्रमांक रानिआ/ग्रापनि-2020/प्रक्र01/का-8 दि.5 मार्च 2020 च्‍या अन्‍वये महाराष्‍ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्‍या कलम 10-1अ मधील तरतुदीनुसार राखीव असलेल्‍या जागेसाठी निवडणुक लढविणा-या इच्छुक असलेल्‍या प्रत्‍येक व्‍यक्‍तीने नामनिर्देशनपत्रा बरोबर सक्षम  प्राधिका-याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहिल असे निर्देश दिले आहे. तरी सर्व संबधीतानी यांची नोंद घ्‍यावी, असे आवाहन राज्‍य निवडणुक आयुक्‍ताने प्राधिकृत केलेले अधिकारी तथा तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.  
  
                                                                                          तहसिलदार नांदेड

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...