Sunday, March 1, 2020


  शंकर साहित्य दरबारानिमित्त
साहि‍त्यिकांना मोठं व्यासपीठ
-          पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 1 :- शंकर साहित्य दरबारानिमित्त साहि‍त्यिकांना मोठं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे व चांगले काम करणाऱ्यांचा गौरव करण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.
 येथील कुसूम सभागृहात डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्त शंकर साहित्य दरबार कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार कुमार केतकर, आमदार लहू कानडे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ औरंगाबादचे अध्यक्ष कौतुकरव ठाले पाटील, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, अनुराधा पाटील, जगदीश कदम, आणि इतर  अनुराधा पाटील आदिंची यावेळी उपस्थिती होती.  
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, गेल्या 16 वर्षापासून संगीत शंकर दरबारचे आयोजन करण्यात येत आहे. डॉ. शंकरराव चव्हाण यांना शास्त्रीय संगीताची आवड होती. त्यामुळे साहित्य दरबाराची कल्पना सुचली आहे. शंकर साहित्य दरबार आयोजित करण्याचे दुसरं वर्ष आहे. नामवंत साहित्यिकांना निमंत्रित करुन त्यांचे मार्गदर्शन, विचार मराठवाड्याला ऐकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शंकर साहित्य दरबारच्या निमित्ताने साहित्यिकांना एकत्र आणण्याच्या कामाची सुरुवात केली असून ती कालांतराने व्यापक होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. साहित्यिक, कलावंत, कवी याचं विविध क्षेत्रासह देशाच्या स्वातंत्र्यामध्ये फार मोठे योगदान दिले असून त्यांनी आपल्या लिखाणातून महत्वाचे कार्य केले आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शारदा भवन शिक्षण संस्थेच्यावतीने दिला जाणारा साहित्य गौरव पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनुराधा पाटील यांना देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी लेखीका करुणा जमदाडे यांनी लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आधारीत उर्जा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी डॉ. शंकरराव चव्हाण व कुसूमताई चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.
000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...