Saturday, February 29, 2020


शासकीय अध्यापक महाविद्यालयात
मराठी भाषा गौरव दिन साजरा
नांदेड, दि. 29 :- शासकीय अध्यापक महाविद्यालयात कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्त 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा  गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनंदा गो. रोडगे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. बालाजी पोतुलवार हे होते.
शासकीय अध्यापक महाविद्यालयात बी. एड. प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थींनी कुसूमाग्रजाच्या जीवन चरीत्रावर आधारीत व मराठी साहित्यात त्यांच्या योगदानावर आधारित अशा भित्ती पत्रकांची निर्मिती केली होती. प्राचार्य व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या  भित्तीपत्रकांचे विमोचन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे डॉ. बालाजी पोतुलवार यांनी मराठी भाषेचा विकास हा मध्यवर्ती विषय ठेवून मराठी भाषेच्या विकासाचे ऐतिहासिक टप्पे विशद केले, तसेच मध्ययुगीन काळातील संतांचें
साहित्य समकालिन भाषेचे स्वरूप
प्रशिक्षणार्थीं सामोर मांडले. प्राचार्य डॉ. सुनंदा गो. रोडगे यांनी मराठी भाषेच्या विकासात भाषेच्या चारही कौशल्य, श्रवण, वाचन, भाषण, लेखन यांचा साकल्याने विकास आवश्यक असुन आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतिशीं संबंधित लोकसाहित्य बोली भाषा यांना आधार मानुन भाषेच्या विकासासाठी सर्वांणी प्रयत्न रहावेत असे आवाहन केले.
               कार्यक्रमात सुरूवातीला प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थींनी कविता, म्हणी, वाक्‍प्रचार, गीत इ. कार्यक्रमात सादर करुन मराठी भाषेचे विविध पैलू सांगितले.
               या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अनुराधा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोईवार गंगाधर यांनी केले, शेवटी आभार प्रदर्शन मोनिका सुरकुट्टलावार यांनी करुन कार्यक्रमाची सांगता झाली. प्रस्तुत कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व प्रशिक्षणार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते, या पद्धतीने महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...