Saturday, February 29, 2020


पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा
नांदेड, दि. 29 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 29 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबई येथुन विमानाने सायंकाळी 6 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व सायं. 7 वा. कुसुम महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- यशवंत महाविद्यालय नांदेड. नांदेड येथे मुक्काम.
रविवार 1 मार्च 2020 रोजी सकाळी 11 वा. शंकर साहित्य दरबार उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- कुसुम सभागृह नांदेड. दुपारी 12 वा. आदिवासी आश्रमशाळा साळवाडी ता. भोकर रौप्य महोत्सवी समारंभास उपस्थिती. स्थळ- आदिवासी आश्रमशाळा साळवाडी ता. भोकर. सायंकाळी 6 वा. GNX-Fitmess जिमच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- दुसरा मजला किशोरदपि प्लॅट नं.  12 टिळकनगर आनंदनगर-भाग्यनगर रोड नांदेड. सायंकाळी 6.30 वा. कुसुम महोत्सव स्पर्धेच्या बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ- यशवंत महाविद्यालय प्रांगण नांदेड.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...