डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या
स्मृती प्रित्यर्थ सिंचन दिन साजरा
नांदेड, दि. 28 :- महाराष्ट्राचे दिवंगत
मुख्यमंत्री कै. डॉ. शंकरराव
चव्हाण यांच्या स्मृती प्रित्यर्थ
26 फेब्रुवारी हा दिवस “सिंचन दिन ”
म्हणून साजरा करण्यात येतो. सिंचन
दिनानिमित्त शेतकऱ्यामध्ये
सिंचन विषयक बाबींची जागरुकता
निर्माण करणे हा आहे. बुधवार 26 फेब्रुवारी 2020 रोजी शंकरराव
चव्हाण सभागृह नांदेड येथे कै. डॉ. शंकरराव चव्हाण
यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन व दिप प्रज्वलाने
समारंभाचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमास अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, महाजन उप्पलवाड, श्री. सुर्यवंशी, संतोष देवराये, डॉ. बालाजी कोंपलवार, डॉ. शिवाजी
शिंदे, निलेश देशमुख, रामराव कदम, रंगनाथराव
कदम,
गोपळ पाटील इजळीकर, राम कदम, भाग्यश्री
कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रस्ताविकात
अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनी
सिंचन दिनाचे औचित्य साधुन
काटकसरीने पाणी वापराची आवशकता, शेतीसाठी आधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर
इ. बाबतीत मार्गदर्शन
केले. कार्यक्रमाची विभागणी 3 सत्रात
केली होती. पहिल्या सत्रात प्रा. संतोष
देवराये यांनी कै. शंकरराव चव्हाण- व्यक्ती
विशेष व त्यांचे सिंचनातील
योगदान या बाबत सविस्तर
विचार मांडले. शंकरराव चव्हाण
यांची जडन घडन, राजकिय कारकिर्द, प्रशासकिय
कौशल्य व मराठवाडयातील जायकवाडी, विष्णुपुरी,
पैनगांगा इ, अनेक पाटबंधारे प्रकल्पाच्या
निर्मीतीतील योगदाना
बद्दल सविस्तर प्रकाश टाकला.
दुसऱ्या सत्रामध्ये
लाभधारक शेतकऱ्यांनी आपले
मनोगत व्यक्त केले.यात प्रामुख्याने सिंचन पुर्व शेती
व सिंचन नंतरची शेतीतील बदल
या बाबत सविस्तर चर्चा
झाली. सिंचनाचे फायदे, समृद्धी, ग्रामिण भागात
झालेला सामाजीक व आर्थीक
बदल या बाबत लाभधारक
शेतकाऱ्यांनी अनुभव व्यक्त केले. शेतीमध्ये
अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुक्षम
सिंचनाचा वापर करुन उत्पादन वाढीवर भर देण्याबाबत
सविस्तर मत मांडले. शेती सोबत
शेती मालावर प्रक्रिया करुन
कषी उत्पादने निर्माण करण्या
बाबत स्वानुभव सांगितला.
तिसऱ्या सत्रात भविष्यातील
सिंचन विषयक आव्हानांची सविस्तर उकल करताना
प्रा.डॉ.
शिवाजी शिंदे व प्रा.डॉ. बालाजी
कोंपलवार यांनी याबाबत काळानुसार “पिक पद्धती राहनीमान, खाद्य पद्धती’’ पुर्णत: बदलण्याची आवश्यकतेवर
भर दिला. पाण्याच्या
उपयोग केवळ पिण्यासाठी, शेतीसाठी उदयोगासाठी
नसुन नागरीकांच्या दैनंदिन
वापराच्या जवळपास 80 टक्के वस्तुची निर्मिती
पाण्यापासुन होत असल्याचे नमुद
केले. चंगळपणा टाळुन
काटकसरीने जगण्याची जीवनशैली
आत्मसात करणे आवश्यक असल्याचे
प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन एस.डी.पवार यांनी
उत्कृष्ठरित्या केले. शेवटी
आर.एम.देशमुख
कार्यकारी अभियंता यांनी आभार
प्रदर्शन केले व उपस्थीत
सर्व तज्ञ, मार्गदर्शक व श्रोत्यांचे
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा
समारोप झाला.
कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी आर.एम.देशमुख, व्ही. के. कुरुंदकर, ए. ए. अनमोड, एन. पी. गव्हाणे, एन. व्ही. पत्वार, श्री. सांवत, श्री. शेख या सर्व
कार्यकारी अभियंत्यांनी परिश्रम
घेतले.
00000
No comments:
Post a Comment