Sunday, March 1, 2020


वृत्तपत्रीय टिप्पणी
खेलो इंडिया फिटनेस असेसमेंट अंतर्गत
नांदेड तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..
नांदेड 19 :- क्रीडा युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे-1 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नांदेड यांच्या वतीने केंद्र शासनाच्या FIT INDIA MOVEMENT अंतर्गत Fitness Assessment Training नुसार प्रत्येक शाळांचे मुल्यमापन होऊन शाळांना मानांकन दिले जाणार आहे. याकरीता नांदेड तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांना राज्यस्तरीय मास्टर्स ट्रेनर्सद्वारे तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दिनांक 29 फेब्रुवारी,2020 रोजी सकाळी 9.30 वा. ऑक्सफर्ड दि ग्लोबल स्कुल, निळा रोड,नांदेड येथे करण्यात आले.
            या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन मा.श्री.बनसोडे, उप शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद,नांदेड यांच्या हस्ते तर याप्रसंगी मा.श्री.विलास चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड, श्री.फ्रान्सेस डी. मनी, प्राचार्य, ऑक्सफर्ड दि ग्लोबल स्कुल, निळा रोड,नांदेड, श्री.गुरुदिपसिंघ संधु, क्रीडा अधिकारी, श्री.आनंद गायकवाड, वरिष्ठ लिपीक आदी मान्यवर उपस्थित होते.
            या प्रशिक्षण शिबीरकरीता नांदेड जिल्हयातील विविध शाळेतून 40 ते 45  क्रीडा शिक्षक उपस्थित होते. सदर क्रीडा शिक्षकांना अद्यावत संगणकावर ऑनलाईन पध्दतीने नांव नोंदणी करुन पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षण पुर्ण करुन आलेले क्रीडा शिक्षक तथा समन्वयक श्री. सतपालसिंघ चौधरी, मास्टर्स ट्रेनर्स श्री.कुरेश अथ्थरोद्दीन, श्री.मिर्झा वसीम बेग, श्री.हाश्मी रहमतउल्ला यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिले.
            सदर प्रशिक्षण यशस्वी करणेकरीता मा.श्री.विलास चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी श्री.गुरुदिपसिंघ संधु यांनी यशस्वी केले. यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी श्री.किशोर पाठक, श्री.प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, श्री.अनिल बंदेल, वरिष्ठ लिपीक आनंद गायकवाड, श्री.संजय चव्हाण, श्री.मोहन पवार, श्री.सुभाष धोंगडे, श्री.धम्मदीप कांबळे, श्री.विद्यानंद भालेराव, श्री.चंद्रकांत गव्हाणे, श्री.सोनबा ओव्हाळ आदीनी सहकार्य केले. असे जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड यांनी कळविले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...