उज्ज्वल नांदेड अंतर्गत कंधार
येथे
स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन
शिबिर संपन्न
नांदेड,
दि. 7 :- जिल्हा प्रशासन नांदेड “उज्ज्वल नांदेड” नाविन्यपूर्ण योजना सन 2019-20 अंतर्गत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या
संकल्पनेतुन जिल्हास्तरावर होणारा स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर पहिल्यांदाच कंधार
येथे तालुकास्तरावर नगरपरिषद संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी सारंग चव्हाण तसेच प्रमुख
पाहुणे पो.नि. गुप्तवार्ता विभाग अधिकारी बालाजी चंदेल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशिष ढोक व एकलव्य
क्लासेसचे संचालक शैलेश झरकर, उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रंथालय अधिकारी श्री. ढोक यांनी जिल्हा प्रशासन नांदेड "उज्वल नांदेड” नाविन्यपूर्ण योजना सन 2019-20 मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती
देऊन सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्या लाभ घेण्याबाबत आवाहन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत या योजनेबद्दल माहिती
देत म्हणाले की ही योजना 11 वर्षापासून
सुरु आहे. नांदेड जिल्हा ग्रंथालय येथे घेतली जात आहे. ती पहिल्यांदाच कंधार येथे तालुकास्तरावर होत आहे
असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते बालाजी चंदेल यांनी स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी
बाबत तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणादायक व सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी
विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले. मुख्याधिकारी सारंग चव्हाण यांनी स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी संबंधी
सखोल योग्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल तसेच वाचक अभ्यासक
विद्यार्थ्यांसाठी नेहमी धडपडत असणारे मुख्याधिकारी व स. ग्रंथपाल महंमद रफिक
सत्तार यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन ग्रंथालय प्रमुख जितेंद्र ठेवरे यांनी केले तर आभार मिलिंद महाराज
यांनी मानले. कार्यक्रमास वाचनालयातील अभ्यासिकेसह प्रा.मुंडे व त्यांच्या क्लासेसचे विद्यार्थी बहुसंख्येने
विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद महाराज, लता ढवळे, राधाबाई जवादवाड, किशन भालेराव, माधव कांबळे, संदीप जाधव यांनी परिश्रम घेतले.
000000
No comments:
Post a Comment