Thursday, November 28, 2019


प्रयास उपक्रमाबाबतचे चर्चासत्र संपन्न
          नांदेड,दि.28:-  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाय योजनातंर्गत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून प्रयास उपक्रम राबविण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्या ही समाजासाठी कलंक असून दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गाव पातळीवर वैफल्यग्रस्त शेतकरी कुटूंबांचा शोध घेणे, त्यांचा आर्थिक , सामाजिक , शैक्षणिक, कौटूबिंक , मानसिक व आरोग्य विषयक अडीअडचणी जाणून घेवून त्यावर शासनाच्या विविध यंत्रणामार्फत त्यांच्या योजनांद्वारे व सामाजिक संस्थांच्या मदतीने अशा प्रकारे मदत करता येईल. विविध किर्तनकार, भजनीमंडळ, ध्यानधारणा व योगसाधना यांच्या माध्यमातून त्यांचे कसे उध्दोधन करता येईल, जेणेकरुन त्यांच्याशी सुसंवाद साधून वैफल्यग्रस्त अवस्थेतून वेळीच बाहेर कसे काढता येईल, या विचार विनिमय आज नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
            प्रयास उपक्रम राबविण्याबाबतच्या चर्चासत्रास जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ ,  जिल्ह्यातील तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषि अधिकारी तसेच  विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
0000

No comments:

Post a Comment

  विशेष लेख   दि.  21  जुलै , 2025                                                                                                   मुख्यमं...