कापूस, तूर, मका पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि.28:- नांदेड जिल्हयात कापुस, तुर, मका, पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे किडीपासुन संरक्षणासाठी संदेश देण्यात येत आहे .
कापुस
या पिकासाठी गुलाबी बोंडबअळीवर लक्ष ठेवावे. रस शोषक किडींसाठी थायोमिथोक्झाम 25 डब्लु जी 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी .
तुर या पिकासाठी
शेंगा पोखरणा-या अळीवर लक्ष ठेवा आणि 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
मका या पिकासाठी लष्करी अळ्या गोळा करुन नष्ट कराव्यात व मेटारहायजियम निसोप्ली 50 ग्रॅम नोमुरिया रिलाई 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment