Tuesday, August 27, 2019


शासकीय अध्यापक महाविद्यालयात वृक्षारोपण
नांदेड, दि. 27 :- शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे स्वातंत्र्य दिनी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयात 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रम पूर्ण झाल्यावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी संकल्प आमचा 36 कोटी वृक्ष लागवडीचा या विषयावर प्राचार्य डॉ. सुनंदा रोडगे यांनी प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, एका व्यक्तिने किमान एक तरी झाड लावून जगविणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे निसर्गात समतोल राखला जाईल व पर्यावरणाची हानी होणार नाही. या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. विठ्ठल घोनशेटवाड यांनी ग्लोबल वार्मिक होण्याची कारणे व त्यावरील उपाय योजनाबाबत मार्गदर्शन केले.
महाविद्यालयात हरितसेनेची शंभर टक्के नोंदणी करण्यात आली. प्रत्येक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थींनी वृक्षारोपण केले व रोपटे वाढविण्याची जबाबदारी स्विकारली. यावेळी प्रा. डॉ. एच. एम. शेख, डॉ. एस. ए. शाकेर, डॉ. पी. डी. जोशी, डॉ. यु. एस. मुरुमकर, डॉ. एस. बी. सारंग, श्री. जाधव, श्री. गच्चे, श्री. सोनाळे, श्रीम. जाधव, श्रीम. राठोड, श्रीम. होळकर व सर्व बीएड प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. शासनाने निर्धारित केलेल्या कालावधीत महाविद्यालय हा उपक्रम राबविणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे डॉ. सुनंदा रोडगे, प्राचार्य शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड यांनी दिली आहे.
0000

No comments:

Post a Comment

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

  76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण     नांदेड, दि. 25 जानेवारी :- ...