Tuesday, August 27, 2019


 रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न
1 सप्टेंबर पासून हेल्मेट सक्तीचे 
नांदेड, दि. 27 :- रस्ता सुरक्षा विषयी समितीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. यावेळी रस्ता सुरक्षाविषयी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. येत्या 1 सप्टेंबर 2019 पासून जिल्हयातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी दिली आहे.
देशातील अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण जवळपास 75 टक्के आहे. त्यापैकी बरेचजण हे फक्त हेल्मेट वापरल्यामुळे डोक्याला जबर मार लागून मृत्युमुखी पडतात. अपघात आणि अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्याचे प्रमाण 10 टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट मा. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने दिले आहे. यासाठी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी दिनांक 1 सप्टेंबर 2019 पासून दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या निर्णयानुसार जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुखांना याविषयी अवगत करण्यात येणार आहे. त्यानुसार टप्याटप्याने जिल्हयातील इतर आस्थापना जसे महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक संस्था, इतर आस्थापना आणि शेवटी सर्व दुचाकी चालकांसाठी हेल्मेट परिधान करणे बंधनकारक करण्यात येणार आहे, अशीही माहिती  प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...