Tuesday, August 27, 2019


सार्वजनिक न्यासाव्यतिरिक्त गणेशोत्सव
 साजरा करणाऱ्या मंडळांना आवाहन
            नांदेड दि. 27 :- सार्वजनिक न्यासाव्यतिरिक्त गणेशात्सव साजरा करणाऱ्या सर्व मंडळांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम  1950 च्या कलम 41-क अन्वये सर्व मंडळांना विहीत नमुन्यात संकतेस्थळावर संबधित न्यास नोंदणी कार्यालयात अर्ज करणे अनिवार्य आहे, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त नांदेड यांनी केले आहे.
मंडळांनी charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर केलेल्या अर्जाचा निपटारा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील कलम 41-क उपकलम 2 अन्वये सात दिवसात करण्यात येईल. प्रत्यक्ष सादर केलेला अर्ज प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसांचे आत निकाली काढण्यात येईल. या तरतुदी अंतर्गत देण्यात येणारे दाखले 6 महिण्यासाठी वैध असतील. या कालावधीनंतर असे दाखले नुतनीकरण करण्यास ग्राहय नसतील. सर्व गणेशोत्सव मंडळांना सदरचा दाखला प्राप्त झाल्यापासुन त्या कालावधीनंतर 2 महिण्यांच्या आत सदर कार्यालयात लेखा परीक्षण अहवाल सादर करणे व उर्वरित रक्कम जमा करणे अनिवार्य आहे.
गणेशोत्सव मंडळाने या तरतुदींप्रमाणे परवानगी न घेतल्यास महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 66- क प्रमाणे 3 महिण्यापर्यंत कैद किंवा परवानगी प्राप्त करण्यापुर्वी गोळा केलेल्या एकुण वर्गणीच्या भविष्यात होणारा अनर्थ टाळण्यासाठी नमुद कायदयाच्या तरतुदींचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पुरग्रस्तांना मदतीसाठी वर्गणी गोळा करण्याबाबत
राज्यातील सांगली, कोल्हापुर, सातारा व इतर जिल्हयात आलेल्या महापुरामुळे बाधित पुरग्रस्त यांच्या मदतीसाठी वर्गणी गोळा करण्याकामी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ अधिनियम, 1950 चे कलम 41 क अन्वये विहित नमुन्यात पुर्वसुचना / अर्ज धर्मादाय उपआयुक्त / सहायक धर्मादाय आयुक्त यांना सादर करण्याची मुभा आहे. अशा मंडळांना / संस्थानी धर्मादाय उपआयुक्त / सहायक धर्मादाय आयुक्त यांनी चौकशी केल्यानंतर अटी / शर्थींना अधिन राहुन दाखला देण्यात येईल. सदर  नमुद कारणासाठी गोळा केलेल्या वस्तु / रक्कमेची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी व गरजुंना ती मदत मिळण्याकरिता सर्व मंडळांनी त्या वस्तु व रक्कमेचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अथवा त्यांनी नेमलेल्या अधिका-याच्या समन्वयाने किंवा निरीक्षणाखाली करणे योग्य असेल.  
संबंधित मंडळांनी माहिती /  पूर्वसुचना देताना पुढील कागदपत्रांच्या प्रति दाखल करणे आवश्यक आहे. सर्व सदस्यांच्या सहीचा ठराव असावा हस्तलिखित प्रत. पदाधिका-यांचे / सदस्यांचे ओळखपत्रांची प्रत सोबत जोडावी फोटो आयडीची प्रत ओळख पटण्याजोगी जसे की, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना आदी.
येणेप्रमाणे संबंधित मंडळांकडुन सुचना प्राप्त झाल्यास त्यांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियमातील कलम 41 क चे उपकलम 3 नुसार सुचना प्राप्त झाल्यापासुन 15 दिवसाच्या आत दाखला देण्यात येईल. परंतु या कार्यालयास मदत / रक्कम गोळा करण्यामध्ये काही फसवणुक वा अपव्यय झाला असे समजण्यास कारण असल्यास धर्मादाय उप आयुक्त व सहायक धर्मादाय आयुक्त त्यांना तशी मदत/रक्कम गोळा न करण्‍याचे आदेश देतील आणि हिशोबपत्रके सादर करुन उर्वरित रक्कम पी.टी.. फंडामध्ये जमा करण्याचे आदेशित करतील. सर्वसामान्यांना मदत करण्याकरिता पुढे आलेल्या व्यक्तींना याची नोंद घ्यावी, असेही आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त नांदेड यांनी केले आहे. 
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...